Adsense


 बाळाचे दात येण्यापूर्वी त्यांच्या हिरड्या मजबूत राहणं गरजेचं आहे. कारण 

लहान बाळांना दात येताना त्रास होतोच. दरम्यान त्यांच्या हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बाळाला दात येताना आणि दात आल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे? यावर एक नजर... 

● बाळाचे दुधाचे दात हिरड्यांमधून बाहेर येण्याची प्रक्रिया साधारणतः 6 महिन्यांनंतर सुरू होते. सुरुवातीला सुळे दात (2), दाढा (2) आणि 4 दात येतात. यानंतर प्रत्येक सहा महिन्याला 4 दात येतात.

● दूध पाजल्यानंतर बाळाच्या हिरड्या स्वच्छ पाण्याने पुसून घ्या.

● लहान मुलांना दोन वेळा दात घासण्याची सवय लावा.

● वेळोवेळी दंतचिकिस्तकांची भेट घेत मुलांच्या दातांची तपासणी करा.

● रात्रभर मुलांच्या तोंडात दुधाची बाटली ठेवू नका. अशाने हिरड्यांचे नुकसान होते. दुधाचे दात आल्यानंतरही असे करणे टाळा.

● जेव्हा बाळ दुधाव्यतिरीक्त आहार घेण्यास सुरुवात करते त्यावेळी त्याच्या हिरड्यांची तसेच दातांची विशेष काळजी घ्या.

Previous Post Next Post