Adsense


 सध्याची बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पेनकिलर घेणे इत्यादी काही कारणांमुळे सध्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी विविध शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. याचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होतो. चला तर खालील काही चुका टाळल्यास यादरम्यान होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून सुटका होऊ शकते...

● मासिक पाळीच्या वेळी घेतली जाणारी पेनकिलर तब्येतीसाठी हानिकारक असतात. यामुळे शरीरातील काही चांगले जिवाणू मरतात. यामुळे ह्रदयविकार, अल्सर, किडनी आणि यकृताच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे हे टाळा.

● पाळीच्या काळात तर काही जणी यावेळी येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी परफ्युम वापरतात. यामुळे फंगल इन्फेक्शनसारखे त्वचाविकार होऊ शकतात. त्यामुळे हे टाळा. 

● मासिक पाळी सुरू असताना खाणे टाळल्याने अशक्तपणा येऊ शकतो. अशा दिवसांत ही हलका आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश यावेळी आहारात करण्याचा प्रयत्न करावा.

● पीरियड्स सुरू असताना दर तीन तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलणे आवश्यक आहे. यामुळे संसर्ग आणि दुर्गंधी या दोन्ही तक्रारी टाळता येतील.

● पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकीन रेयॉन, कॉटन यापासून बनवलेले असतात. यामध्ये वापरले जाणारे हानिकारक केमिकल्स आणि पेस्टीसाइडचे दुष्परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतात.यासाठी नेहमी ऑरगॅनिक कॉटनपासून तयार केलेले सॅनिटरी नॅपकीन्स वापरा.

● मासिक पाळीच्या वेळी हलकाफुलका शरीराला झेपेल असा व्यायाम करावा. व्यायामामुळे येणाऱ्या घामातून शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. 

Previous Post Next Post