Adsense


 रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाली कि, मुलं लवकर आजारी पडतात. अशा परिस्थितीत पालक आणि पाल्य दोघे ही त्रासात असतात. या काळात बाळांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यावर एक नजर... 


● झोपेची काळजी घ्या : मुलांचे दात निघतात तेव्हा ते त्रस्त असतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्ती वर परिणाम पडतो. शक्य असल्यास प्रयत्न करा की, मुलांची झोप 8 ते 10 तासाची व्हावी.

Read More ऑटिझम मुलांची योग्य वेळी योग्य उपचारांची होण्याची गरज

● व्हिटॅमिन सी द्या : लहान मुलांसाठी फळांचे सेवन फायदेशीर आहे. त्यांना फळांचा रस किंवा ज्यूस द्यावा. द्राक्ष, संत्री खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. उकडलेला बटाटा देखील मुलांना देऊ शकतो.


● स्तनपान गरजेचे : जे बाळ आईचे दूध पितात ते कमी आजारी पडतात. आईच्या दुधात अँटीबॉडी, प्रोबायोटिक्स, प्रथिन, वसा, साखर,इत्यादी आढळतात. जे मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. बाळ जर स्तनपान करत नाही तर चिकित्सकांचा सल्ला घ्यावा.


● लसीकरणाच्या बाबतीत दुर्लक्ष नको : लहान मुलांच्या लसीकरणाच्या बाबतीत दुर्लक्ष करू नको. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच रोग प्रतिकारक शक्तीवर होतो. त्यांच्या लसीकरणाची योग्य काळजी घ्या.Previous Post Next Post